नगरसेविका लोखंडे यांच्या पुतण्यावर हल्ला करणारे अटकेत
पुणे, दि. 09, नोव्हेंबर - भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका स्वाती लोखंडे यांच्या पुतण्यावर राजकीय वादातून हल्ला करणार्या चारजणांना शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. हे सर्व पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याक डून पिस्तूल आणि धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
राजु बापु ढावरे ( वय 27), सागर विलास देवकुळे (वय 23, दोघेही रा. 806, कामगार पुतळा झोपडपट्टी), सुरज उर्फ छोटया ज्ञानेश्वर पवार (वय 23) आणि दत्तात्रय उर्फ बंकी मोहन साठे (वय 27, दोघेही रा. शंकर महाराज वसाहत, बौध्द विहार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार; ढावरे आणि त्याच्या साथीदारांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या नगरसेविका स्वाती लोखंडे यांच्या पुतण्यावर राजकीय वादातून हल्ला केला होता. हे सर्व आरोपी कामगार पुतळयाच्या परिसरातील नदीपात्रात असलेल्या शंकराच्या मंदिराजवळ बसले असून त्यांच्या जवळ पिस्तूल आणि कोयता अशी हत्यारे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकातील पोलीस क र्मचारी तुषार खडके यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने याठिकाणी छापा टाकून ढावरे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली, त्यांच्याकडून पिस्तूल आणि कोयता अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.