Breaking News

पिंपरी-चिंचवडमध्ये 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित होवू देवू नका - गिरीश बापट.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटात राणी पद्मिनीचा अपमान केला असल्याचा आरोप राजपूत समाज संघटनेने केला आहे. त्यांच्या वतीने पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढून पालकमंत्री बापट यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी बापट म्हणाले की, 'पद्मावती' चित्रपट पाहून सेन्सॉर बोर्डाने जे मान्य केले आहे, मात्र ते नागरिकांना मान्य नाही. ते कट करा आणि नागरिकांनी मान्यता दिल्यानंतर तो सिनेमा दाखवा, असे पत्र मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.


'पद्मावती' चित्रपटाच्या विरोधात शहरातील राजपूत समाज संघटनेने सोमवारी (दि. २७) पिंपरीत आंदोलन केले. आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची मागणी केली. त्याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे बापट यांनी सांगितले..