Breaking News

अनिकेत जाधव खूनप्रकरणी नऊ जण गजाआड


आकुर्डीतील रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपी व सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर याच्यासह आणखी पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. निगडी पोलिसांनी रविवारी (दि. २६) रात्री वेगवेगळ्या ठिकाणांवरून या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, पकडण्यापूर्वी सोन्या काळभोरवर गोळीबार झाल्याची चर्चा आहे, परंतु पोलिसांनी काही घडले नसल्याचे म्हटले आहे.
विवेक सोपान काळभोर ऊर्फ सोन्या, अक्षय काळभोर (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी), दत्ता काळभोर (रा. समर्थनगरी, निगडी), जीवन सातपुते, अमित ऊर्फ बाबा फ्रान्सिस (दोघेही रा. भोसरी) या पाच जणांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. तर, यापूर्वी या प्रकरणी महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे, तेजस प्रदीप मांडलिक (वय २१, रा. दत्तवाडी, आकुर्डी), अक्षय सुरेश नेहरे (वय २१, रा. आकुर्डी), वासुदेव ऊर्फ संतोष हिरामण जोशी (वय २५, रा. आकुर्डी) अशा नऊ आरोपींना अटक केली आहे..