Breaking News

धोनीसमोरच झाला आफ्रिदीच्या नावाचा जयजयकार !


भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नुकताच बारामुल्ला जिल्ह्यातील कुनमेर येथे आला.इंडियन आर्मीने आयोजित केलेल्या चिन्नर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये त्याला विशेष अतिथी म्हणून बोलाविले होते.
मात्र धोनी जेव्हा नवोदित खेळाडूंशी चर्चा करत होता तेव्हा एक विचित्र प्रसंग घडला.यावेळी काही लोकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून बुम बूम आफरीदीच्या घोषणा यावेळी लोकांनी दिल्या.