Breaking News

व्यावसायिकांच्या पोटावर पाय आणल्यास विरोध : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : कास पठार परिसरात तेथीलच स्थानिक भुमिपुत्रांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत छोटे-छोटे व्यवसाय थाटले आहेत. निसर्गाला कोणत्याही प्रकारची  बाधा न पोहचवता, शासकीय अथवा, वन विभागाच्या जागेत अतिक्रमण न करता या व्यावसायिकांनी आपली रोजीरोटी सुरु केली आहे. असे असताना महसूल विभागाने त्यांच्यावर  गुन्हे दाखल करुन वेठीस धरण्याचा प्रकार सुरु केला आहे. पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. हा महत्वाचा प्रश्‍न या व्यावसा यिकांमुळे सुटला आहे. प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यापेक्षा अधिकारात असलेले परवाने या व्यवसायिकांना द्यावेत, अशी आग्रही मागणी करतानाच कास परिसरातील व्यावसायिक ांच्या पोटावर पाय आणल्यास टोकाची भुमिका घेवू, असा गर्भित इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 
निसर्ग टिकला पाहिजे. त्याचबरोबर पर्यटकांना भोजन, निवास आदी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, हेही महत्वाचे आहे. कास पठार परिसर हा डोंगरी भाग असल्याने तसेच शेती होत  नसल्याने या परिसरातील असंख्य लोक पुणे, मुंबईला रोजगारासाठी गेले. मात्र, कास पठाराची जागतीक वारसास्थळात नोंद झाली. कास पठार एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ  म्हणून प्रसिध्द झाल्याने गेल्या काही वर्षात पुणे, मुंबई सोडून हे भुमिपूत्र गावाला परतले. त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. या भुमिपुत्रांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या  खाजगी जागेत छोटी-छोटी हॉटेल उभारली. या भुमीपूत्रांवर अन्याय होवू नये यासाठी मी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. तसेच महसूल विभागाच्या अधिकारात असणारे परवाने  देवून या भुमिपूत्रांचा व्यवसाय शासनमान्य करावा. त्यासाठी लागणारा दंड आकारावा, अशी रास्त मागणीही मी त्यावेळी प्रशासनाकडे केली होती. असे असताना कास पठार प रिसरातील काही स्थानिक हॉटेल चालकांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून ही बाब पुर्णपणे चुकीची आणि अन्यायकारक आहे.
एकीकडे पर्यटन वाढले पाहिजे असे म्हणायचे आणि दुसरीकडे पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार्‍या व्यवसायिकांच्या व्यवसायांवर टाच आणायची, अशी दुटप्पी आणि  अन्यायकारक भुमिका प्रशासनाने घेतली आहे. शासनाच्या अथवा वनविभागाच्या जागेत अतिक्रमण असेल तर, प्रशासनाने जरुर कारवाई करावी. परंतु, या व्यावसायिकांनी स्वत:च्या  मालकीच्या जागेत व्यवसाय सुरु केले असून या व्यवसायांमुळे भारतासह जगभरातून येणार्‍या पर्यटकांची सोय होत आहे. या व्यवसायांमुळे भुमिपुत्रांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालत  आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या भुमिपुत्रावर गुन्हे दाखल करुन त्यांच्या व्यवसायावर टाच आणण्यापेक्षा शासनाच्या निकषानुसार दंड आकारुन या भुमिपुत्रांचे व्यवसाय अधिकृत  करावेत, अशी मागणी आ. भोसले यांनी केली आहे. गुन्हे दाखल करुन कास परिसरातील भुमिपुत्रांच्या पोटावर पाय आणल्यास त्याचे गंभिर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील.  स्थानिक भूमिपूत्रांना बरोबर घेवून प्रशासनाच्या विरोधात तिव्र लढा उभारणार असून या भुमिपुत्रांसाठी टोकाची भुमिका घेतली जाईल, असा गंभिर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  पत्रकाद्वारे दिला आहे.