Breaking News

समतेचे राज्य आणण्यासाठी काँग्रेसजणांनी इंदिराजींच्या आदर्षाचा अंगीकार करावा-सानंदा

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर - राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांनी केलेले कार्य महान आहे. सत्ता असो वा नसो याची पर्वा न करता सतत संघर्ष करुन इंदिराजींनी हुकुमशाही विरोधात लढा  उभारला. देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी इंदिराजींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणुनच आज त्यांचे नाव जगामध्ये अजरामर आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुध्दा इं दिराजींच्या आदर्शाचा अंगीकार करुन  देशामध्ये समतेचे राज्य आणण्यासाठी व जनकल्याणासाठी  रस्त्यावर उतरुन कोणालाही न घाबरता आंदोलने करावी व लोकांना न्याय  मिळवुन द्यावा. येणारा भविष्यकाळ हा काँग्रेससाठी सुवर्ण काळ राहील असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. 
दि.31 ऑक्टोंबर रोजी येथील जनसंपर्क कार्यालयात   भारताच्या माजी पंतप्रधान राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  निमित्त  काँग्रेसच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अभिवादन करतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.सुरजितकौर  सलुजा,न.प.काँग्रेस पक्षनेता सौ.अर्चनाताई टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, इंदिराजींनी देशहितासाठी घेतलेल्या अनेक महत्वपुर्ण निर्णयामुळे त्यांना “आर्यन लेडी’’ म्हणुन सुध्दा ओळखले जाते. त्यांनी  सतत अन्यायाविरुध्द न्याय मिळवुन देण्यासाठी कार्य केले.   लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी  भारत देशासाठी केलेले कार्य महान असुन त्यांच्या अनुभवी व्यक्तीमत्वामुळेच  त्यांना स्वातंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात महत्वाचे स्थान मिळाले होते. अश्या या महापुरुशांच्या विचारांची  आज राष्ट्राला खर्‍या अर्थाने गरज असल्याचे राणा दिलीपकुमार  सानंदा यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने व न.प. काँग्रेस पक्षनेता सौ.अर्चनाताई टाले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रमाता इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल   यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित  मान्यवरांनीही माल्यार्पण करुन या महापुरुषांना आदरांजली वाहिली. यावेळी अमर रहे, अमर रहे, इंदिरा गांधी अमर रहे, सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे अश्या घोषणा यावेळी  देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर काँग्रेस कमिटचे सचिव  अशोक मुळे यांनी तर आभार प्रदर्शन अल्पसंख्यांक सेलचे  शहर अध्यक्ष बबलु पठान यांनी केले.
यावेळी  नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेवक शेख फारुख बिसमिल्ला, माजी नगरसेवक शेख नईम शेख मेहबुब, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, युवक काँग्रेस  ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल,   महादेव बोचरे, काकु पठान, मुष्ताक खान, इलीयाजभाई, अवधुत टिकार, कमलेष वर्मा, प्रितम माळवंदे, बाळु पाटील, शिवाजी इंगळे, राजेश धामनक ार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.