Breaking News

मध्यावधी निवडणुका झाल्यास तयार रहाण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुखांना  दिले. या बरोबरच भाजपच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात जागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत श्री. ठाकरे बोलत होते.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेश, कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी आदी मुद्यांच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  आगामी काळात मध्यावधी निवडणुका झाल्यास त्या दृष्टीने तयारीत रहाण्याबाबत रणनीती आखण्यात आली. बैठकीत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, सुभाष  देसाई, दिवाकर रावते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.