Breaking News

गच्चीवरील हॉटेल व्यवसायाला मुंबई महापालिकेची मंजुरी

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - मुंबईत गच्चीवरील हॉटेल व्यवसाय करण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी आज मंजुरी दिली. या निर्णयामुळे लॉज, मॉल्सच्या गच्चीवर हा ॅटेल्स उभारता येणार आहे.
रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. रुफटॉप हॉटेल्स हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या संदर्भात  महापालिकेत सादर केलेला प्रस्ताव मंजुरीअभावी सभागृहात अडकला होता. त्याला अखेर आयुक्त मेहता यांनी मंजुरी दिल्याने याचा मार्ग मोकळा झाला आहे.