Breaking News

शिवसेनेकडून घोटाळेबाज भाजप’ पुस्तिका प्रकाशित

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - राज्यात युती सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या वतीने ॠघोटाळेबाज भाजप’ नावाची पुस्तिका आज प्रकाशित करण्यात  आली. यामध्ये गेल्या तीन वर्षांत भाजपचे विविध मंत्री व नेत्यांवर असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. या माध्यमातून भाजपच्या नेत्यांचे घोटाळे  जनतेसमोर नेऊन जनजागृती करण्याचे आदेश शिवसेनेच्या पदाधिका-यांना देण्यात आले आहेत.
यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, गिरीश बापट, विष्णू सवरा, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, रणजित पाटील, आ. प्रविण दरेकर, खा. दिलीप गांधी आदी नेत्यांच्या  छायाचित्रांसह घोटाळ्यांची माहिती देण्यात आली आहे.