मातृसेवासंघासारख्या संस्थांना प्रोत्साहनाची गरज -नितीन गडकरी
नागपूर, दि. 11, नोव्हेंबर - स्व. कमलाताईं होस्पेट यांनी सेवाभावी वृत्तीने आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. समाजात अनेकजण सेवाभावाने काम करताना दिसतात. अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मातृसेवा संघाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व पद्मश्री स्व. कमलाताई होस्पेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त नागपुरातील सुरेश भट सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना गडकरी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राणी बंग, मातृसेवा संघाच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वैदेही भाटे, इरावती दाणी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, मातृसेवा संघासारख्या विविध सेवाभावी संस्थांची समाजाला आवश्यकता आहे. सेवाभावी संस्थांनी गरिबांपर्यंत सेवा पोहचवावी. आजाराचा प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने नागपूर शहर व जिल्ह्यात महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आगामी काळात विविध क्षेत्रात लोकसहभागातून कामे उभारण्यावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.