Breaking News

पारनेर बलात्कार प्रकरणी तिघे दोषी

नगर, दि. 07, नोव्हेंबर - पारनेर (जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन जणांना दोषी करार दिला आहे.  यामध्ये संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्ता शिंदे या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या तिघांवर बलात्कार, हत्येसह सहा विविध आरोप ठेवण्यात आले होते.
22 ऑगस्ट 2014 रोजी लोणी मावळा गावात दहावीत शिकणा-या मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तीवादानंतर या तिघांना दोषी करार देण्यात आला.