Breaking News

देणग्यांमधील अनियमितते मुळे आपला प्राप्तिकर विभागाची नोटीस


देणग्यांमधील अनियमितते मुळे प्राप्तिकर विभागाने आम आदमी पार्टीला नोटीस बजावली आहे. तब्बल 30 कोटींच्या देणगीसंदर्भात सदर नोटीस बजावण्यात आली आहे.प्राप्तिकर विभागाला त्यांच्या देणग्यांमधे मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानं त्यांच्याकडून दंडवसूलीसाठी नोटीस पाठवली आहे. 7 डिसेंबरपर्यंत त्यांना या नोटीसचं उत्तर देण्यास सांगितलं आहे.
मात्र याबाबत आपने आम्हाला मिळालेल्या सर्व देणग्या अधिकृत असून त्यात कुठलीही अनियमितता नसल्याचं सांगितलं आहे.यासंदर्भात आम आदमी पक्षाचे खजिनदार दीपक वाजपेयी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. आपने प्रत्येक पैशाचा हिशोब दिला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.