Breaking News

थंडी वाढल्यामुळे उबदार कपड्यांना मागणी

जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - जळगाव शहरात काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. तिबेटी लोकांच्या या कपड्यांच्या दुक ानात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीही वाढत आहे. यात स्वेटर, मफलर कानटोपी, कानपट्टी आदीची खरेदी जास्त होत आहे. मात्र, या सर्व वस्तूंच्या दरात यंदा जीएसटीमुळे 20 टक्क् यांनी दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक गरिबांना हे कपडे घेणे कठीण होत आहे. तसेच अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडेही उबदार कपड्यांची विक्री होत आहे. तर  काही रस्त्यांवर दुकाने थाटली आहेत.