कोणत्याही प्रकारचे आश्वासन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिले नाही
विधान परिषद अथवा मंत्रीपदाचे कोणत्याही प्रकारचे आश्वासन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिले नाही, मात्र एनडीएच्या विस्ताराप्रसंगी त्यांचा मंत्रीपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्राच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी दानवे आले होते. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या एका रिक्त जागेसाठी अर्ज भरण्यात आला.
या वेळी राणे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राणे नाराज झाले असल्याचे दिसून येत आहे. या वेळी रावसाहेब दानवे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेचा ५ वर्ष कार्यकाळ सरकार पूर्ण करेल. तसेच मध्यवधी निवडणुकांचा त्याचा अंदाज असेल, असा टोला सेनेला त्यांनी लगावला.