Breaking News

कॅन्सर रुग्णांसाठीच्या मार्गदर्शनासाठी लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्डचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - कॅन्सर रुग्णांसाठीच्या मार्गदर्शनासाठी लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्ड चा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण  मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे काढले. लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्डचे (तढइ) श्री. महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
श्री. महाजन म्हणाले, राज्यशासन, नॅशनल कॅन्सर ग्रीड, टाटा मेमोरियल सेंटर, अणु ऊर्जा विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर नियंत्रणाचा एक व्यापक आराखडा  तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत राज्य शासन नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या सहकार्याने लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्ड (त ढ इ) ची सुरुवात करीत आहे. भारतातील हा अभिनव प्रयोग  असून या अग्रगण्य तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामध्ये नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या सर्व हा ॅस्पिटलमधील कॅन्सर तज्ज्ञांचा समावेश असून, गुंतागुंतीच्या क्लीष्ट कॅन्सर रुग्णांवर करावयाच्या उपचाराबाबत वेबद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आज महाराष्ट्राच्या 12.3 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास दिड लक्ष लोकांना दर वर्षी कॅन्सर होतो. आजमितीस रुग्णांपैकी जवळपास 40 ते 50 टक्के रुग्ण कँन्सरमुळे दगावले जातात.  कँन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर उपचार झाले तर हा रोग बरा होऊ शकतो. या उपक्रमाचा फायदा महाराष्ट्रभरातील दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना होऊन त्यांना तज्ज्ञांचा  सल्ला व उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही.
सर्व वैद्यकीय महाविद्यालये नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये समाविष्ट होऊन या मिशनद्वारे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवतील. या अंतर्गत सर्व शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयातील डॉक्टर, नर्स व तंत्रज्ञ यांना टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये फेलोशिप सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती श्री.महाजन यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रायोगिक तत्वावर नागपूर व अकोल्यातील स्तन कॅन्सर, गर्भ कॅन्सर व मुख्य कॅन्सर असलेल्या तीन रूग्णांना तज्ज्ञांकडून लाईव्ह मार्गदर्शन करण्यात आले. श्री. महाजन  यांनी या उपक्रमासाठी टाटा ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा यांचे विशेष धन्यवाद मानले.