उपविभागीय पोलीस अधिकारीनी मागविला अहवाल .
श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा तालुक्यातील वाळू तस्करीत पोलीस आणि पत्रकारही अशी बातमी दैनिक लोकमंथन या वृत्तपत्राने प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली. कर्जत श्रीगोंदा चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी याबाबत दोन्ही पोलीस ठाण्याकडून पोलीस कर्मचाऱ्याविषयीचा अहवाल मागवला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात वाळू तस्करीचा कहर माजला असून प्रशासनातील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यास जबाबदार असल्यामुळेच तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करीमध्ये केवळ वाळू तस्कर नसून यामध्ये महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि इलेक्ट्रानिक मीडियाचे व काही प्रिंट मीडियाचे पत्रकार मंडळीही समाविष्ट असल्याची बातमी दैनिक लोकमंथन ने प्रकाशित केली.
या वृत्त प्रशासनाने प्रसिद्ध केल्यानंतर महसूल प्रशासनाची झोप गेली नाहीच, मात्र पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली. श्रीगोंदा कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी याबाबत श्रीगोंदा आणि बेलवंडी या दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक याना याबाबतचा अहवाल मागविला. अहवाल मिळताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुढे यांनी दिली आहे
