Breaking News

शेवगावमध्ये आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवेची जयंती साजरी .

शेवगाव/प्रतिनिधी/- तालूक्यात एल.टी. डी. ई . संघटनेच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या 223व्या जयंती निमित्ताने "बहुजन संख्यावा मेळावा"संपन्न झाला. कार्यक्रमात समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान कॉ अनंत लोखंडे,उदघाटक मा प्राचार्य शिवाजीराव देवढे तर प्रमुख उपस्थिती भारत पवार व प्रा रामदास अढागळे तसेच प्रमुख पाहूने म्हणून मा विश्वासराव वैरागर, बाळासाहेब साळवे, तिरोडकर साहेब ,कॉ संजय नांगरे ,,डॉ के आर लोणकर,गोरख शेलार होते.  


कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन अॅड लक्ष्मण बोरूडे यांनी केले . तर आभार प्रदर्शन सुनील शिंदे यांनी मानले. अतिशय मार्मिक भाषेत देवढेनी आपले विचार मांडले. अध्यक्ष साहेब कॉ लोखंडे संघटना म्हणजे काय? व ती कशा पद्धतीने काम करते ?याबाबतचे सखोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास अॅड अनिल पहीलवान, सुखदेव गोरे ,,कारभारी गायकवाड सर, कोमल पवार ,स्वप्नाली आैताडे, जयस्री ससाणे ,जया तुजार, इश्वर बनसोडे,अमोल पेटारे,नितीन मिसाळ, बाळासाहेब गालफाडे ,तुजारे सरपंच विनोद मोहीते ,साळवे (पाडळी)अमोल गायकवाड व संपूर्ण एल टी डी इ परीवार कार्यक्रमाला उपस्थित होता