Breaking News

अहमदनगर क्लब विषयी शहर वासियांमध्ये तीव्र नाराजी

अहमदनगर/प्रतिनिधी- ज्यांनी आपल्या व्ययसाय नफ्यातून शहर विकासाचा भार उचलायचा ते विकास निधीत भर घालणार्‍या करमणूक करासारख्या उत्पन्नाला कात्री बसेल असे धोरण स्वीकारू लागल्याने शहर विकासाने कुणाच्या तोंडाकडे पहायचे असा राग नगरकर आळवू लागले आहेत. 


अहमदनगर क्लब लिमिटेडने महसूल मंत्र्यांकडे असलेली आपले राजकीय वजन वापरून लाखो रूपयांचा करमणूक कर बुडविल्याप्रकरणी शहर वासियांमध्ये या क्लबविषयी नकारात्मक भावना पसरली आहे. ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेल्या अहमदनगर या गावाला सातत्याने विश्‍वासघाताचा अनूभव येत असल्याने सर्वक्षेञात विकसीत होण्याची क्षमता असूनही राज्यातील सर्वात मागास जिल्हा केंद्राचे शहर म्हणून नामुष्की सोसण्याची वेळ आली आहे.

शासन पातळीवरून राबविल्या जाणार्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीत राजकारणाचा शुक्राचार्य अडसर ठरत असल्याने शहर विकसीत होण्याऐवजी भकास होत आहे. राजकारणाच्या दरिद्री हस्तक्षेपामुळे शहर विकसीत होत नसेल तर स्थानिक पातळीवर निर्माण झालेले सामाजिक नेतृत्व पर्यायी मार्ग शोधून विविध मार्गाने लोकवर्गणीतून जनहितैषी विकास योजना राबविण्याचा प्रयत्न करते.

शहरातील विविध व्यवसायिक,व्यापारी,उद्योजक यांच्या नफ्यातील काही वाटा मिळवून शहार विकास करता येतो.सामाजिक बांधिलकी जपणारे असंख्य उद्योजक ,त्यांच्या सामाजिक संस्था या कामात पुढाकार घेऊन कार्पोरेट सोशल रिस्पान्सीबीलीटी फंडाची तरतूद करतात.काही सामाजिक संस्था पुढाकार घेऊन शहार विकासात योगदान देतात.या मार्गाने महाराष्ट्रात अनेक शहरे विकसीत झाली आहेत,होत आहेत. 

अहमदनगर शहाराच्या दुर्दैवाने अनेक सामाजिक संस्थांना इच्छा असूनही सीएसआर किंबहूना उधळपट्टीऐवजी सामाजिक कामात स्वारस्य दाखविणार्या व्यापारी व्यावसायिकांच्या नकारात्मक भुमिकेमुळे प्रामाणिकपणाला मुरड घालावी लागत आहे.शहरात कार्यरत असलेल्या काही सामाजिक संस्था,ऊद्योजक संस्था ,व्यापारी मंडळ प्रामाणिकपणे शहर विकासात योगदान देत असले तरी काही योगदान देण्याचा विचार तर दुर पण शासकीय करमणूक करासारखे उत्पन्नही शासकीय तिजोरीत भरण्याचा चुकारपणा करतात.शासकीय तिजोरी जमा होणारा हा विविध कररूपी भरणा विकास निधी म्हणून शासन प्रशासन वापरत असते.

हा करनिधी भरला गेला नाही तर एकूण उत्पन्नावर पर्यायाने या निधीतून मिळणार्या विकासनिधीला काञी लागते.नगर शहराच्या बाबतीत बोलायचे झाले तर या संदर्भात अहमदनगर क्लब लिमिटेडने हीच चुक केल्याने तब्बल सतरा लाखाचा करमणूक कर बुडवून या क्लबने नगरकरांच्या विकासनिधीलाच काञी लावल्याची भावना शहरवासीय व्यक्त करू लागले आहेत.

करमणूक कर माफ करून व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी अहमदनगर क्लब लिमिटेडने महसुल मंञ्यांकडे जेव्हढे वजन वापरले तेव्हढे वजन शहर विकासासाठी खर्च केले असते तर शहरवासीयांनी नागरी सत्कार केला असता अशाही भावना व्यक्त केल्या जात आहेत.