Breaking News

थोरात कारखान्याच्या वतीने सहकार सप्ताह साजरा

संगमनेर (प्रतिनिधी ) सहकार हा ग्रामीण विकासाचा राजमार्ग असून रायासह संगमनेर तालुक्यात सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.निकोप सहकार टिकविणे व वाढविणे महत्वाचे असून सहकार चळवळीमुळे राज्याच्या ग्रामीण भागाचा मोठा आर्थिक व सामाजिक विकास झाला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या वतीने सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. 


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्यावर सहकार सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,जगन आव्हाड,कामगार संचालक केशव दिघे, राजेंद्र कढणे, शंकर ढमक,मंडलीक मामा,शेतकी अधिकारी खर्डे,किशोर देशमुख, नामदेव कहांडळ आदि मान्यवर उपस्थितीत होते.दि.14 ते 21 नोव्हेंबर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी भाऊसाहेब कुटे म्हणाले कि,सहकाराला मोठी समृध्द परंपरा आहे.

सहकारातून रायाच्या ग्रामीण भागाचा मोठा विकास झाला आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकारातून विकासाचा पाया घातला.मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शना खाली संगमनेर साखर कारखाना,राजहंस दुध संघ,अमृतवाहिनी बँक,शेतकी संघ यांसह सर्व सहकारी संस्था आपल्या पारदर्शक व स्वच्छ कारभारातून रायात गौरवास्पद ठरल्या आहेत.ग्रामीण भागात सेवा सोसायट्या पतसंस्था,पाणीपुरवठा यांसह विविध सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण झालेले आहे.

एक चांगली परंपरा व शिस्त या संस्थांना आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामीण जीवनमान बदलले आहे.या समृध्दीने शहराची बाजारपेठ फुलली आहे. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले कि,मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी ठरला असून एक विकसित व वैभवशाली तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे.

यापुढे ही परंपरा टिकवितांना निकोप सहकार टिकविला पाहिजे. सहकार सप्ताहामुळे सहकार चळवळीला बळ मिळत असून विविध व्याख्याने मेळावे यांचे आयोजन सहकार विभागाच्या वतीने होत असते असे ही ते म्हणाले.यावेळी सभासद,कार्यकर्ते,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.