Breaking News

नोटाबंदी विरोधात शिवसेना-मनसे नगरसेवकांचे आंदोलन


पुणे, दि. 11, नोव्हेंबर - महापालिकेच्या सभागृहात शिवसेना-मनसेच्या नगरसेवकांनी अनोखे आंदोलन केले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी नोटबंदीला 1 वर्ष झाल्यानिमित्त वर्षश्राद्ध घातले. त्यानिमित्त शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांकडून काळ्या टोप्या घालून नोटबंदीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे महापालिकेत मनसेचे 2 नगरसेवक चक्क सुरक्षारक्षकांच्या वेशात आले. त्यांनी सुरक्षारक्षकांच्या मागणीसाठी सुरक्षारक्षकांच्या वेशात सभागृहात प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक पगारवाढीची मागणी करत आहेत. त्यांच्या याच मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांकडून हे आंदोलन करण्यात आले.