Breaking News

नोकरीचे आमिष; लाखो रुपयांची फसवणूक करणा-यां दोघांना अटक.

सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर - रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केलेल्या फरार हवालदारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दहा ते पंधरा जणांची फसवणूक 2010 मध्ये झाली होती. 23 जुलै 2016 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. 


त्यांना करमाळा पोलिसांनी पकडले असून, त्यांना 20 तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील हवालदार दिगंबर निवृत्ती मारकड (वय 54 रा. उमरड ता. करमाळा) बाळासाहेब दिगंबर मारकड (वय 26 रा. मारकडवाडी, ता. माळशिरस) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. जुलै 2016 मध्ये नागेश दत्तात्रय बरडे (वय 28 रा. ऱावगाव, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती. 

2007 ते 2009 नागेश बरडे हा पुणे येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत होता. या दरम्यान त्याची हवालदार दिगंबर मारकड यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी मारकड यांनी दुसरा आरोपी बाळासाहेब मारकड याची ओळख करून देऊन तो सीए आहे असे सांगून आठ लाखांत रेल्वेमध्ये मुलांना नोकरी लावतो, असे सांगितले. साडेचार लाख रुपयांत या दोघांनी नोकरी लावण्याचे कबुल केले होते.