अटक करण्याची धमकी देवून लाच घेणार्या पोलिसास अटक
जालना, दि. 27, नोव्हेंबर - पैसे दिले नाही, तर तुला आणि तुझ्या आईला जेलमध्ये पाठविन जामीनसुध्दा होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन तक्रारदाराकडून हजार रुपयांची लाच घेणार्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ कोंडिबा ठाकरे असे आरोपी पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल क रण्याची प्रक्रिया सुरु होती.
तक्रारदाराच्या आईविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून त्याचा तपास पोलिस नाईक विश्वनाथ ठाकरे यांच्याकडे होता. ठाकरे यांनी वडरवाडी, पिंपळी येथे जाऊन तक्रारदारास या गुन्ह्यात मदत करण्यासाठी जामीन मिळवून देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला तुझ्या आईला तुरुंगात पाठवेन जामीनही मिळू देणार नाही, अशी त्यांना धमकीही दिली.
मात्र तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी नंतर 10 हजार रुपये लाचेची मागणी के ली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ठाकरे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आष्टी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील भिंतीजवळ सापळा लावण्यात आला. त्यावेळी ठाकरे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडयात आले.