Breaking News

पदर अडकून महिलेसह चिमुकलीचा अपघात

औरंगाबाद, दि. 27, नोव्हेंबर - धावत्या दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकल्याने अपघात होऊन दुचाकीवरील 28 वर्षीय महिलेसह चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी बिल्डाफाटा येथे घडली. भाग्यश्री कृष्णा पवार (वय 28), किर्ती बोर्डे (वय 4 वर्षे) (रा. मयुरपार्क) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. 



आज सकाळी जखमी भाग्यश्री या पती कृष्णा पवार व किर्ती यांच्यासोबत (एम.एच. 21, के.के. 5880)या दुचाकीवरून औरंगाबादहून जालना जिल्ह्यातील खंडाळा या गावी जात असताना फुलंब्री जवळील बिल्डाफाटा येथे दुचाकीच्या मागे बसलेल्या भाग्यश्री यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या टायरमध्ये अडकला व काही समजण्याच्या आतच त्या चार वर्षीय कीर्तीला घेऊन खाली रस्त्यावर पडल्या.