Breaking News

महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत जपान शिष्टमंडळासमोर सादरीकरण

मुंबई / नवी दिल्ली, दि. 07, नोव्हेंबर - महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जपान देशाने गुंतवणूक करावी, यासाठी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी जपान शिष्टमंडळासमोर  सादरीकरण केले.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि जपानच्या गुंतवणूकदार कंपन्याची, प्रथम संयुक्त गटाची बैठक पुसा येथील सभागृहात झाली. यावेळी श्री.  सिंग यांनी हे सादरीकरण केले.
शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार आहे. नुक त्याच पार पडलेल्या वर्ल्ड फूड इंडिया-2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘अन्न प्रक्रिया धोरण’ जाहीर केले असल्याचेही श्री. सिंग यांनी सांगितले. यामध्ये गुंतवणुकदारांसाठी सोयी सु विधा पुरविण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे  उत्पादन वाढविणे व शेतमालावर प्रक्रिया करून त्यास योग्य दर मिळवून देण्यात येत आहे, अशी माहितीही श्री. सिंग यांनी दिली.