Breaking News

पोलिसांच्या गोळीबारात आंदोलक शेतकरी जखमी

औरंगाबाद, दि. 16, नोव्हेंबर - : पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील शेतकरी उध्दव मापारी हे ऊस उत्पादक शेतक-यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत आज शेतकर्यांनी पैठण शेवगाव रस्त्यावर उसाला योग्य भाव दयावा या मागणीसाठी रस्ता रोको केला त्यांनी उसाचे ट्रक मोठया प्रमाणात अडवले आणि जाळपोळ केली 


आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी (15 नोव्हेंबर) गोळीबार केला. यात एका शेतक-याच्या छातीत छर्रा घुसला. हा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत या वेळी पोलिसांनी पोलिसांनी अश्रूधुराचा माराही केला.
यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 100 रुपये एकरकमी भाव मिळावा ही मागणी असून सोमवार पासून उसाच्या गाडया अडविण्यात येत होत्या.आज राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून लाठीमारही झाला. आज पैठणाच्या सात शेतकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.