Breaking News

‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून रिंकूच्या आई- बाबांचही चित्रपटसृष्टीत प्रदार्पण.



सैराट चित्रपटातील सगळय़ांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर झळकणार आहेत.

‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱया एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचे रुपांतर मोठय़ा जनआंदोलनात होते. मात्र, हे झालेले रुपांतर त्याला कळत नाही. त्याच्यासमोर केवळ एकच लक्ष्य असते आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे.