जगविणाऱ्या परमात्म्याला मरेपर्यंत विसरू नका - रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक
भगवंतांची करुणा सागरा सारखी विशाल असून दुःखाचा संसार सुखाचा करण्यासाठी भगवंत चरणी विलिन व्हा असे मार्गदर्शन ही त्यांनी यावेळी केले.नेवासा तालुक्यातील त्रिवेणीश्वर देवस्थान प्रांगणात सुरेशनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. दगडू पाटील उभेदळ यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख,संत तुकाराम महाराज,देवस्थानचे प्रमुख हभप उद्धव महाराज मंडलिक,रामायणाचार्य अरूणगिरी महाराज,पवनपुत्र आश्रमाचे महंत बजरंग महाराज,हभप बाजळू महाराज कानडे,गायनाचार्य हभप प्रकाश महाराज कातकडे,माजी आमदार पांडुरंग अभंग यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे प्रमुख महंत व कार्यक्रमाचे संयोजक आदर्श सुरेशनगर गावचे सरपंच पांडुरंग उभेदळ व सुनीलगिरी महाराज यांनी उपस्थित संत महंतांचे स्वागत करून संतपूजन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,काशिनाथ नवले,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे,रघुनाथराव आगळे सर,शेतकरी नेते पी.आर. जाधव,तहसीलदार उमेश पाटील,गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, भानसहिवऱ्याचे सरपंच देविदास साळुंके,माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर,जनार्धन पटारे,हंडीनिमगावचे सरपंच आण्णा पाटील जावळे,भिवाजी आघाव,अशोकराव बोरा,निवृत्ती पा. काळे, दिनकर गर्जे,डॉ.अशोक शिंदे, गणेश गव्हाणे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,बाळासाहेब केदारे,विठ्ठल पाषाण,यांचेसह हजारो भाविक उपस्थित होते. उपस्थितांचे कार्यक्रमाचे संयोजक सुरेश उभेदळ यांनी आभार मानले. डॉ.रेवणनाथ पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
