मंडल कृषी अधिकारी कार्यालयाची इमारतची झाली दुरवस्था
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मंडल कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत ची दुरावस्था ओढवलेली असुन ती पुर्णपणे पडायला आलेली आहे. इमारतीला पूर्णपणे काटेरी बाभळीचा विळखा पडलेला दिसून येतॊय. या कार्यालयाकडे दहा बारा वर्षे झाले तरी कुणी अधिकारी फिरकलेच नाही.
अधिकारी येथे थांबत नसल्याने तिथे अस्वच्छता व सगळीकडे घाण झालेली आहे. तिथे मंडल कृषि अधिकारी १० वर्षा पासून नान्नजच्या कृषी कार्यालयात येत नाही. त्या मुळे ती इमारत १० वर्षापासून बंद आहे. आता सध्याला त्या इमारती जवळ नागरिक गेले तर तिथे दुर्गंधी सुटलेली आहे.
पूर्णपणे मोडकळीस येऊन ती कधी पण अचानक पडू शकते. खिडक्याचे काचा फुटलेल्या आहे. आत मध्ये सगळे मातीचे ढीग लागले आहे व घाणीमुळे उंदरांनीसुद्धा या ठिकाणी आपले बस्तान मांडलेले आहे. नान्नज व परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषीच्या कोणत्या व काय योजना आल्या? तर नान्नज व परिसरातील शेतकऱ्यांना काहीच माहिती पडत नाही.
नान्नज ला कृषी कार्यालय असून मंडल कृषी अधिकारी जामखेड तालुक्याच्या ठिकाणी बसून काम करत आहे. नान्नजच्या शेतकरी काय काम असेल. तर त्या शेतकऱ्यांला नान्नज हुन 17 किमी अंतरावर जामखेड ला जावे लागत आहे. अशी परिस्थिती पालकमंत्री राम शिंदेच्या मतदारसंघात चालली आहे. एखाद्या शेतकरीने कामासाठी अधिकारीला फोन लावला की अधिकाऱ्याने शेतकरीला म्हणायचे कि, जामखेडला या. अशी अवस्था झाली आहे हया शेतकर्यांची.
अधिकारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. म्हणून अधिकारी वर्ग बिनधास्त आहे. त्यांना कोणाचा धाक राहिला नाही. म्हणून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. नान्नजच्या शेतकऱ्यांचे काही काम असले तर, त्यांना जामखेडला जावे लागते. तरी तिथे अधिकाऱ्याचा तपास नसतो. शेतकरीला जामखेडला जाऊन दिवसभर ताटकळत बसावे लागते. तसेच मोकळया हाताने परत यावे लागते.
शेतकऱ्याने जामखेडला जाऊन काही विचारना केली ?तर त्यांना तिथे उडवा उडवीचे उत्तर मिळते. नान्नज ला एक ते दोन वेळेस ग्रामसभेत ठराव पण झालेला आहे की कृषीअधिकाऱ्याने कायमस्वरूपी नान्नजच्या कार्यलय मध्ये थांबावे. ठराव होऊन देखील अधिकारी थांबत तर नाहीच पण नान्नजला कधी फिरकतच पण नाही . शेतकऱ्यांना अजून देखील माहित नाही की कोण अधिकारी आहे? म्हणून येवढी बिकट अवस्था शेतकऱ्यांची आहे. अधिकारी नान्नजला येत नसल्याने नान्नज चे शेतकरी काही योजना आली तरी त्या योजने पासून वंचित राहतात.
त्यामुळे कृषी विभागाने या इमारतीची दुरूस्ती करून नान्नजला मंडल कृषि अधिकारीची लवकरात लवकर नेमणूक करून त्या अधिकाऱ्याना नान्नजला जाण्याचे आदेश दयावे. म्हणजे शेतकऱ्यांचे काही अडचणी असतील तर त्या दूर होतील . जे कोणी मंडळ कृषी अधिकारी नान्नज ला असतील, त्या मंडळ कृषी अधिकाराची नान्नजला नेमणूक नाही केली, तर आंदोलन छेडण्याचा इशारा नान्नज व परिसरातील नागरिकानासह शेतकऱ्यांनी दिला आहे.