Breaking News

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - मराठा समाजाच्या मागण्यांचे काय झाले, सरकारची त्यावर काय भूमिका आहे याचा जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांना दि. 4 नोव्हेंबर रोजी येथील क्रांतीचौक येथे भेटणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांंगण्यात आले. कोपर्डी पीडितेला न्याय, मराठा आरक्षण, शेतक-यांची  सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी वर्षभरात 70 पेक्षा जास्त प्रचंड मोठे मोर्चे मराठा समाजाने काढले. मात्र या सर्व समस्यांची स्थिती  आजही तशीच आहे. मराठा समाजाला फक्त आश्‍वासनावर झुलवत ठेवले अशी आमची भावना झाली आहे असे यावेळी मोर्चा समन्वयक यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या  समन्वयकांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 नोव्हेंबर रोजी औरंगाबादला येणार असून कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाब  विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.