हुंदाईची फॅमिल कार सँट्रो पुन्हा एकदा नव्या रुपात भारतात दाखल होणार.
2014 मध्ये सँट्रोचं उत्पादन बंद केल्यानंतर आता पुन्हा एकदा सँट्रोला रिलाँच करण्यात येणार आहे. हुंदाई सँट्रोला पुढील वर्षी भारतात लाँच करणार आहे. ही कार अगदी फॅमिली बजेट लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
आॅल न्यू सँट्रोला आॅटो एक्सपो 2018 मध्ये सादर करण्यात येणारआहे. इंडियन आॅटोमोबाईल मार्केटमध्ये न्यू सँट्रो कमबॅक करून मारुती सुझुक सॅलेरिओ, रेनो क्विड आणि टाटा टियागोला टक्कर देणार आहे. न्यू सँट्रोच्या टेस्टिंगचे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोवरून न्यू सँट्रोही जुन्हा सँट्रोसारखीच टालबाॅय डिझाईनमध्ये असणार आहे.