गुरुवारी पाकिस्तानच्या कोर्टाने हाफिज सईदची मुक्तता केली. हाफिज सईदच्या या जामिनावर भारताने नाराजी व्यक्त केलीये मात्र याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड सुटल्याने नरेंद्रभाई बात नहीं बनी' असं टि्वट राहुल गांधींनी केलंय. गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास कोणतीही संधी सोडत नाहीये. अलीकडे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध दृढ झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्या दबाबानंतर हाफिज सईदला अटक करण्यात आली असा दावा केला गेला.