Breaking News

नोटाबंदी : भाजपातर्फे अभिप्राय नोंदणी मोहीम; नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - एकीकडे विरोधी पक्ष नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस, वर्ष श्राद्ध असे आंदोलने करीत असताना भाजपाकडून नेमके याउलट अभिप्राय नोंदणी  अभियान राबविण्यात आले. याला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला.
भाजपा महानगरतर्फे आज शहरात अभिप्राय मोहिम राबविण्यात आले. यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून येणा-या व  जाणा-या नागरिकांच्या अभिप्राय नोंदवून घेण्यात आले. यात काही नकारात्मक तर काहींनी नोटबंदीचा निर्णय खरच चांगला असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी आजचा दिवस हा  ‘नोट बंदी’ संदर्भात विरोध करत आपले प्रखर मत व्यक्त केले.