नोटबंदीच्या निषेधार्थ मेहकर तहसिल समोर काँग्रेसची निदर्शने
बुलडाणा, दि. 09, नोव्हेंबर - तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने 8 नोव्हेंबर रोजी मागील वर्षी ह्याच दिवशी भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रूपयांच्या नोटा चलनातुन बंद केल्याचा निषेधार्थ मेहकर तहसील समोर आज निदर्शने केली.
गेल्यावर्षी 500 व 1000 च्या नोटबंदीमुळे भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय व गरीब जनता ह्या निर्णयामुळे हैराण झाली. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण झाली. व्यापारी, शेतकरी वर्ग हवालदिल झाला, व्यवहार पुर्ण पणे ठप्प झाले तसेच अनेक नागरिक ह्या नोटबंदी व नोटा बदलीच्या रांगेत बँक समोर लाईनमध्ये उभे राहून शेकडो जण मृत्युमुखी सुध्दा पडले. ह्या नोटाबंदीच्या निर्णयाचा कोणताच फायदा झाला नाही. तसेच काळा पैसा सुद्धा बाहेर आला नाही आणि देशाचा विकास झाला नाही. तर शेतकरी मजुर हे हवालदिल झाले याचाच एक वर्षानंतर आज काळा दिवस म्हणून निषेध केला तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवून निरदर्शने केले.
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, शामभाऊ उमाळकर, नगराध्यक्ष कासमभाई गवळी, कलीम खान, वसंतराव देशमुख, नाजीम कुरेशी, अंनत वानखेडे, भरत आल्हाट, अजगर ट्रेलर तसेच सर्व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते हजर होते.