नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या.
औरंगाबाद, दि. 24, नोव्हेंबर - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वैजापूर तालुक्यातील भगूर येथील एका शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली. गणपत त्र्यबक मोरे (58, रा. भगूर) या शेतक-याने शेतात फवारणी करण्यासाठी आणलेले किटकनाशक सेवन केले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी गणपत यांना उपचारासाठी दाखल केले.
त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याची नोंद विरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणपत यांच्यावर वैजापूर येथील मर्चट को. बँकेचे 60 हजारांवर कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर्षी शेतात काही पिकले नाही. डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी निराश होवून आत्महत्या केली.