पोलिस उपअधिक्षक दीपाली काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कोथळे कुटुंबियांची मागणी
सांगली, दि. 10, नोव्हेबर - अनिकेत कोथळे याच्या खूनप्रकरणी हलगर्जीपणा करून दिशाभूल करणा-या सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना आरोपी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, या खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी व आपल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अनिके त कोथळे याच्या कुटुंबियांनी गुरूवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे केली.
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी- कर्मचा-यांच्या अमानुष मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांची गुरूवारी विजयकुमार काळम- पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.
पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे याला झालेली अमानुष मारहाण ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाची सखोल माहिती सांगली जिल्हा पोलिस प्रशासनाक डून आपण घेतली आहे. संबंधित दोषी पोलिस अधिकारी- कर्मचा-यांवर कारवाई होण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहोत. आम्ही सर्वजण आपल्या कुटुं बियांसमवेत आहोत. या प्रकरणात दोषी असणा-या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाहीही विजयकुमार काळम- पाटील यांनी दिली.
त्यावेळी अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांनी याप्रकरणी श्रीमती दीपाली काळे यांना आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या खून खटल्यात ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व युवराज कामटे याच्यासह सर्व आरोपींना ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी, युवराज कामटे याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांच्या मालमत्तेची चौकशी होऊन त्यांचे कॉल डिटेल्स तपासले जावेत, या संपूर्ण प्रकरणाची निपक्षःपातीपणे चौकशी करावी, मयत अनिकेत कोथळे याच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी व त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला राज्य शासनाकडून मोफत शिक्षण मिळावे आदी मागण्या केल्या.