Breaking News

गिरगावात साकारले गड-किल्ले, छायाचित्र व व्यंगचित्राचे अनोखे प्रदर्शन

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - ’गिरगाव प्रबोधन’ आयोजित किल्ले बांधणी, छायाचित्र व व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शन, 2017 हा उपक्रम दि 28 आणि 29 ऑक्टोबर 2017 रोजी  गिरगावातील शारदा सदन शाळेत पार पडला. यंदा या उपक्रमा चे तिसरे वर्ष होते. 
किल्ले प्रदर्शना चे मुख्य आकर्षक ठरले ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असणारा 11 फुटाचा राजगड त्याचप्रमाणे 300 किलोहून अधिक वजनाचा भव्य सरसगड साक ारण्यात आला होता. तसेच सिधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, कुलाबा, प्रतापगड, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, रायगड अशा 20 हुन अधिक गडकिल्यांची सफर या प्रदर्शनातुन झाली. बालकलाक ारांनी पण या स्पर्धेत खुप मोठया संख्येने सहभाग घेतला होता. व्यंगचित्रातुन समाज प्रबोधना उत्तम कार्य होत असते.दुदैवाने ही कला लोप पावत चालली आहे यातील कलाकारांच्या  कलागुणांना वाव मिळावा. म्हणून गिरगांव प्रबोधन ने या वर्षी पासून व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शनला प्रारंभ केले
यातील कलाकारानी सोशल मीडिया चे फायदे व तोटे ,स्वच्छ भारत आणि आजच्या घडामोडी तील सामाजिक व राजकीय समस्या तील कटू सत्यता निदर्शनास आणून दिली.
गिरगांव फोटो फ़ेष्टमध्ये स्ट्रीट फोटोग्राफी, निसर्ग, व भारतीय संस्कृती या विषयावर 50 हुन अधिक स्पर्धकांनी त्याची कला सादर केली. या दोन दिवसीय प्रदर्शनाला मुबंई व  उपनगरातून फार मोठ्या संख्येने प्रेक्षकानीं हजेरी लावली.
या प्रदर्शनात विविध गड किल्ले ची प्रतिकृती पाहून खर्‍या गडकिल्ला वर ची जाण्याचीओढ लागली आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना इतिहास अधिक सोप्या  पद्धतीने समजावा व गड किल्ल्याचा चा सखोल अभ्यास व्हावा यासाठी पार्ले टिळक शाळे ने प्रदर्शना अंती काही किल्ले त्यांचा संग्रही ठेवण्याची विनंती केली त्याला गिरगांव प्रबोधन ने  मान्यता देऊन किल्ले सुपूर्द केले.
व्यंगचित्र स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते व त्या बरोबर हुतात्मा चौका चे आर्किटेक्ट ज्येष्ठ वास्तू विशारद  प्रवीण काटवी, त्याच प्रमाणे शिवसेना दक्षिण मुबंई लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावुन आयोजकांचे कौतुक केले. त्याच बरोबर विविध  क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.