Breaking News

’जय स्वच्छमेव जयते बोला’च्या विशेष प्रिमीयरला राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - ’जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आज नरीमन पॉईट येथील आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आले होते.  चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव, नागालँडचे राज्यपाल पी. आचार्य हे सपत्नीक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिनेमातील मुख्य  कलाकार मकरंद अनासपुरे उपस्थित होते.
हा चित्रपट स्वच्छ भारत अभियानास समर्पित आहे. सुमित पवार हे चित्रपटाचे निर्माते असून सचिन शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मकरंद अनासपुरे हे चित्रपटात प्रमुख  भूमिकेत आहेत.