Breaking News

साता-यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात नोटाबंदीचे वर्षश्राध्द

सातारा, दि. 09, नोव्हेंबर - नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला  एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने साता-यातील कार्यालयात नोटाबंदीचे वर्षश्राध्द घातले. भाजप सरकारने  मागील वर्षी 8 नोव्हेंबरला व्यवहारात सुरू असलेल्या 500 व हजार रूपयांच्या नोटा कोणतीही पुर्व देता अचानक बंद केल्याने मोठा जनक्षोभ निर्माण झाला. ही नोटाबंदी केल्यानंतर  अनेकांना जीवही गमवावे लागले. भाजप सरकारने देशाला अच्छे दिन दाखवण्याच्या स्वप्नामध्ये सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळवले. म्हणून या नोटाबंदीमुळे ज्यांना आपला जीव  गमवावा लागला त्यांचे आत्म्यास श्रध्दांजली वाहण्याच्या हेतूने सातारा येथील राष्ट्रवादी कार्यालयात या नोटांच्या प्रतिमांचे पूजन करून या नोटांचे वर्षश्राध्द घालण्यात आले.