Breaking News

कोल्हापूरच्या विजय धुमाळने कुस्तीचे विजेतेपद पटकावले

सातारा, दि. 09, नोव्हेंबर - शितोळेनगर (निमसोड) ता. खटा माजी सरपंच कै. पै. आप्पासाहेब शितोळे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कोल्हापूर  येथील मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळ याने पुणे येथील काका पवार तालमीच्या गोकुळ आवारेला पोकळ घिस्सा लावत अस्मान दाखवून प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे विजेतेपद  पटकावले. पै. धुमाळ यास संयोजकाच्या वतीने 2 लाख 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांकाची 1 लाख 51 हजार इनामाची उमेश शिरतोडे विरुध्द अतिश मोरे  ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत माळशिरसच्या सोन्या सोनटक्केने घुटना लावत विशाल शिंदेला चितपट केले. रामदास पवार (पारगांव) विरुध्द  योगेश शेळके ही कुस्तीही बरोबरीत सोडविण्यात आली. कुस्ती मैदानाच्या यशस्वीतेसाठी बेंगलोर मराठा बुलीयन रिफायनरी असोसिएशनचे सचिव विजयशेठ शितोळे, माजी सरपंच  सुभाषराव शितोळे व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले. पै. अर्जुन पाटील, श्रीमंत जाधव, किरण पवार, पांडुरंग शितोळे, आण्णा घाडगे, महाडीक वस्ताज यांनी पंच म्हणून काम पा हिले. आ. जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, काकासाहेब मोरे, सुरेशशेठ शिंदे, धोंडीराम मोरे, राज शेडगे, सितारामशेठ मोरे, अमोल मोरे, शिवाजीराव देशमुख, महेंद्र  देशमुख, सुभाष मोरे, प्रशांत मोरे, अजित देशमुख, एस. टी. मोरे आदिंसह परिसरातील मान्यवरांनी मैदानास भेट देवून संयोजकांचे कौतुक केले.