शिवसेनेचे खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन
नंदुरबार, दि. 06, नोव्हेंबर - नंदुरबार जिल्हयाला गुजरात व मध्यप्रदेश राज्याशी जोडणारा प्रकाशा येथील तापी नदीवरील महत्वपूर्ण पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासाठी सकाळी शिवसेनेने या पुलावर वृक्षारोपण करून आंदोलन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले.
एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील वेगळ्याच घोषणा करतात. मात्र त्यांच्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हा पूल धोकादायक स्थितीत आला आहे. येत्या सात दिवसात देखभाल आणि दुरुस्ती झाली नाही, तर बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात येत्या काळात प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.