सावदा येथे अवैध दारुचा साठा जप्त
जळगाव, दि. 06, नोव्हेंबर - सावदा पोलिसांनी शहरात एका ठिकाणी धाड टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई रात्री करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .
सावदा येथे अवैध दारू विक्री होत असल्याबाबत अनेक दिवसापासून तक्रार होती. अनेक ठिकाणी देशी व विदेशी दारू अद्यापदेखील भर रहदारीच्या जागी सर्रास विकली जात होती. चर्मकार वाड्यात एका घराजवळ देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री 7 वाजेदरम्यान तपासणी केली असता सचिन उर्फ सत्या नामदेव ठोसर याच्या घराशेजारी देशी दारूचा माल ठेवलेला पोलिसांना आढळून आला.
यावर कारवाई करीत पोलिसांनी सर्व माल जप्त केला व सचिन ठोसर याच्याविरूद्ध सावदा पोलीस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत पोलिसांनी संजीवनी देशी दारुच्या 180 एमएलच्या बाटल्यांचे 52 बॉक्स, किंमत सुमारे एक लाख 11 हजार रुपये व टेंगो देशी दारूच्या 180 एमएलच्या बाटल्यांचे 40 बॉक्स किंमत सुमारे 86 हजार असा एकूण 92 बॉक्स किंमत एक लाख 97 हजार रुपये दारुसाठा जप्त करून ताब्यात घेतला.