गुजरातमधील नॅनोचा प्रकल्प बंद पडण्याच्या दिशेने
टाटा मोटर्स आपल्या छोट्या नॅनो मोटारीच्या विद्युत वाहनाच्या अवतारामध्ये आता पेश करत असून ओला ४०० नॅनो ई-वाहने नवी दिल्लीत घेणार आहे, तर कोइमतूर येथेही नॅनोच्या या अवताराला उतरवले जाणार आहे. यामुळे नॅनो उत्पादनबाह्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
असे असले तरी पेट्रोलवर चालणाऱ्या मूळ नॅनोचे उत्पादन मात्र प्रचंड घसरले असून दिवसाचे सरासरी उत्पादन दोन नॅनो इतकेच असल्याचे दिसत आहे. तर वितरकांकडूनही नॅनोसाठी मागणी नोंदली जात नसल्याचे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये आढळून आले आहे.
यामुळेच नॅनो उत्पादन आता बंद होण्याच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. गुजरातमधील साणंद येथे नॅनोचा प्रकल्प असून देशभारातील वितरकांनी नॅनो नोंदवणे बंद केले आहे.