Breaking News

चिखलीत स्व.प्रमोद महाजन यांना आदरांजली

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर -  दि. 30 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.  सुरेशआप्पा खबुतरे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास आर्यनंदी अर्बन को-ऑप. पतसंस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशआप्पा खबुतरे यांनी  यावेळी स्व.प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पअर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यातआली. त्यांच्याविषयी सांगतांना सुरेशआप्पा खबुतरे यांनी सांगितले  की, स्व. प्रमोद महाजन हे असाधारण प्रतिभेचे धनी होते. प्रमोदजी त्या राजकीय नेत्यांमधून होते ज्यांच्या तेजस्वी वक्तृत्वामुळे लक्षावधी श्रोत्यांसह राजकारणी तथा जनतेला त्यांनी  मंत्रमुग्ध केले होते. आपल्या तेजस्वी वक्तृत्वामुळे-त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. भारतीय जनता पक्षाकरिता त्यांचे योगदान अविस्मरणीय असून त्यांचे योगदान चिरकाल सर्वांना  प्रेरणा देणारा आहे. यावेळी भाजपा सरचिटणीस श्रीरंग पितळे, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडीचे आयुष कोठारी, डॉ.दिलीप खरात पाटील, साहेबराव पाटील, शिवाजीराव कुटे,  प्रल्हाद भालेकर, अमित खबुतरे, शिवाजीराव बनसोडे, संदीप जाधव, गजानन पाटील, रमेशआप्पा देशमाने, आकाश चुनावाले, आकाश महाजन, विनोद खरे यांच्या बहुसंख्य नाग रिक उपस्थित होते.