आता मिळेल अवघ्या २० रुपयांत १ जीबी डेटा
मुंबई : मोबाइल फोन इंटरनेट डेटा पुरवण्याच्या क्षेत्रात स्वस्त टॅरिफ प्लॅन देऊन सध्या रिलायन्स जिओने इतर कंपन्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. याच वेळी जिओपेक्षाही स्वस्त इंटरनेट देणाऱ्या 'वाय-फाय डब्बा' कंपनीने बाजारात पदार्पण केले आहे.
या स्थानिक कंपनीने ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक ऑफर देऊ केली आहे.'वाय-फाय डब्बा' कंपनीने २ रुपयांत १०० एमबी डेटा उपलब्ध करून दिला आहे. तर २० रुपयांत १ जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ २४ तासांसाठी असणार आहे.
बंगळुरूमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे. सध्या एकाच शहरात ही सुविधा सुरू असली तरीही येत्या काही दिवसांतच इतर शहरातही आपली ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांना रिचार्जसाठी डेटा प्रीपेड रिचार्ज कूपन घ्यावे लागणार आहे. हे कूपन बंगळुरूतील छोट्या दुकानांवर सहज उपलब्ध होईल.