अखेर झहीरलाही बाऊन्सर टाकणारी कोणीतरी मिळाली !
नवी दिल्ली : भारताचा माजी तेज गोलंदाज झहीर खान आणि सिनेतारका सागरिका घाटगे यांचा शुभविवाह अत्यंत साधेपणाने गुरुवारी झाला. या विवाहाची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसिद्ध झाली. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला आणि झहीरचा भारतीय संघातील सहकारी गौतम गंभीरने आपल्या सहकाऱ्याला मोलाचा सल्ला दिला आहे. गंभीरने ट्विटरवर म्हटले आहे, शुभविवाहाबद्दल झहीर आणि सागरिकाचे अभिनंदन. अखेर झहीरलाही बाऊन्सर टाकणारी कोणीतरी मिळाली आहे. माझ्या भावा, अनुभवावरून तुला सल्ला देऊ इच्छितो की यापुढे कधीही चेंडू हूक किंवा पूल करण्याचा प्रयत्न करू नकोस. केवळ चेंडू डक (मान खाली घालणे) अथवा डोके चेंडूच्या दिशेत येणार नाही याची काळजी घे.