Breaking News

देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचे ‘अन्न प्रक्रिया धोरण’ जाहीर

मुंबई / नवी दिल्ली, दि. 05, नोव्हेंबर - : राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच  शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे ‘अन्न प्रकिया धोरण 2017’ जाहीर केले.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने येथे सुरु असलेल्या ‘वर्ल्ड फूड इंडिया’ कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी विज्ञान भवनातील सभागृह क्रमांक चार मध्ये आयोजित क ार्यक्रमात उभय मंत्री महोदयांनी राज्याचे ‘अन्न प्रक्रिया धोरण’ जाहीर केले. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव  बिजय कुमार, भारतीय उद्योग संघाचे उपाध्यक्ष बी. थैयरंगराजन उपस्थित होते. महाराष्ट्राला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात  विकास करणे, या उद्योगात शेतकर्‍यांचा सहभाग वाढवून येत्या 5 वर्षात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे, या क्षेत्रात जवळपास 5 लाख कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करणे, सकस  आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे आदी महत्त्वाचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.
राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकताना 2010-11 मध्ये देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नोंदणीत तिस-या क्रमांकावर असल्याचे या धोरणात  नमूद आहे. तसेच, 1991 ते मार्च 2012 पर्यंत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात 1,039 कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे. या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विक ास महामंडळाच्यावतीने फूड पार्क, वाईन पार्क, फ्लोरीकल्चर पार्क उभारण्यात आले आहेत. या मुख्यत्वे सातारा, पैठण, वर्धा, औरंगाबाद, नागपूर, बुटीबोरी (नागपूर), विंचूर (ना शिक),पलूस (सांगली) सांगवी (सातारा) येथील फूड पार्कचा उल्लेख आहे.
राज्यात काजू, आंबा, संत्री, टोमॅटो, मसाले, भात, डाळी, सोयाबीन वरील प्रक्रिया उद्योगासाठी विविध क्लस्टर उभारण्यात आले आहे. राज्य शासनाने वाईन निर्मिती क्षेत्राला लघु  उद्योगाचा दर्जा दिला असून वाईन निर्मिती उद्योगातही राज्याने आघाडी घेतली आहे. राज्यात 35 पेक्षा अधिक वाईनरी असून त्यासाठी 1,500 एकरावर द्राक्ष लागवड केली जाते.  अन्न प्रक्रिया उद्योगाला पूरक अशा 185 तांत्रिक संस्था राज्यात उपलब्ध आहेत.