Breaking News

ठाण्यात टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

ठाणे, दि. 11, नोव्हेंबर - ठाणे महापौर चषक अखिल भारतीय मानाकंन टेबल टेनिस स्पर्धेचे 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्धाटन 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेचा कॅडेट व सब-ज्युनिअर गटाचा पारितोषिक वितरण सोहळा 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तसेच या स्पर्धेच्या उर्वरित गटाचे अंतिम सामने व पारितोषिक वितरण सोहळा 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे.