नवाझ शरीफांविरुद्धची सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत तहकूब
बहुचर्चित पनामा पेपर्स प्रकरणी गोत्यात आलेले पाकचे पदच्युत पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात सुरू असलेली सुनावणी येत्या ४ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आपल्याविरुद्धचे तीन खटले एकत्र करण्याचा आग्रह शरीफ यांनी केला आहे.
त्यावर सुनावणी स्थगित करण्याचा फैसला सुनावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने (एनएबी) गेल्या ८ सप्टेंबर रोजी ६७ वर्षीय नवाज शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी न्या. मोहम्मद बशीर यांनी सुनावणी केली.