स्वच्छ भारत अभियानाला जलसंधारणमंत्री राम शिंदेंकडून हरताळ,उघड्यावर लघुशंका व्हिडीओ व्हायरल.
जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
मंत्रीच असं वागत असतील तर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला तडा बसत असल्याचं जाणकारांचा म्हणणं आहे त्यामुळे राज्यातील मंत्रीच जर या अभियानाला हरताळ फासत असतील तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.
