Breaking News

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास


दुपारी शाळेकडे खेळायला गेलेल्या अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राकेश बाबूराव देवईकर (२६, रा. हळदवाही, ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे.

१६ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी शाळेकडे खेळायला गेली होती. यावेळी राकेश देवईकर हा युवक तिच्याजवळ गेला. त्यानंतर त्याने पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात नेले आणि विनयभंग केला. 

न्यायालयाने पीडित मुलगी व अन्य साक्षीदारांचे बयाण नोंदवून तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी राकेश देवईकर यास भादंवि कलम ३५४ (ब) अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि बाललैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियमान्वये तीन वर्षांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.